बायोस्कोप
बायोस्कोप हा एक मनोरंजक प्रकल्प आहे जिथे चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी एकत्र येऊन एकच चित्रपट बनवला आहे. या चित्रपटात चार स्वतंत्र कथा आहेत. रवी जाधव यांचा मित्र हा संदीप खरे यांच्या कवितेवर आधारित आहे. अहिरे यांचा दिल_ए-नादन हा मिर्झा गालिब यांच्या गजलवर आधारित आहे. विजू माने यांचा एक होता काऊ हा सौमित्र यांच्या कवितेवर आधारित आहे. गिरीश मोहिते यांचा बैल हा कवी लोकनाथ यशवंत यांच्यावर आधारित आहे.
